Codechef4u is a community for computer professionals,by computer professionals,just like you; who loves sharing and helping each others,Join them
Share your post

फिशिंग आणि डिजिटल फसवणूक

आतापर्यंत आम्ही सायब�� सुरक्षेविषयी भरपूर लेख इंग्रजी मध्ये लिहले पण हा प्रथमच लेख आम्ही मराठी मध्ये प्रकाशित करत आहोत ,कारण कोरोनासारख्या महामारीत फिशिंग अटॅक पासून अनेक लोकांचे आर्थिक नुकसान आणि फसवणूक होऊ शकते हे लक्ष्यात आल्यानंतर आम्ही हा लेख लोकांपर्यंत पोहचवण्याचे ठरवले.

काय आहे हा फिशिंग प्रकार?

फिशिंग हा एक सायबर क्राइम(गुन्हा) आहे ज्यात एखाद्या व्यक्तीस वैयक्तिक माहिती, बँकिंग आणि क्रेडिट कार्ड तपशील आणि ओटीपी ,पासवर्ड ,बँक अकाउंट  यासारख्या संवेदनशील डेटा(माहिती) मिळविण्याकरीता कायदेशीर संस्था म्हणून एखाद्याद्वारे ईमेलद्वारे, टेलिफोनद्वारे किंवा मजकूर संदेशाद्वारे,व्हाट्सअप ,सोसिअल मीडिया द्वारे लक्ष्य किंवा लक्ष्यांशी संपर्क साधला जातो.

कशे होतात फिशिंग अटॅक?

१. बनावट वेबसाईट लिंक,बनावट अँप तुम्हाला काहीतरी मोह दाखवून किवां वोट, सर्वे च्या नावाखाली तुमची वयक्तिक माहिती रजिस्टर करा सांगतात आणि हि माहिती हल्लेखोरांना पाठवली जाते/किवां माहितीचा दुरुपयोग केला जातो(या सर्व बनावट लिंक आणि अँप ई-मेल , मेसेज , सोसिअल मीडियावर पाठवले जातात)

2. फसव्या लोकांकडून २५ लाखाची लॉटरी लागली आहे/KBC ची लॉटरी आहे /एवढे हजार मिळणार म्हणून अनेक कॉल्स आणि मेसेजेस,ई-मेल येत असतात,असे कॉल्स आणि मेसेजेस फक्त तुमचे बँक अकाउंट, क्रेडिट कार्ड, बँक माहिती, ओटीपी , पासवर्ड गोळा करण्यासाठी केले जातात ..गोळा केलेली माहिती तुमचे अकाउंट मधले पैसे चोरण्यासाठी किवां आंतरराष्ट्रीय ऑनलाईन शॉपिंग मध्ये वापरले जाऊ शकतात(जो कॉल्स Voice over Internet Protocol (VoIP) प्रोटोकॅल वापरून केला जातो आणि तो संवेदनशील माहिती चोरतो अश्या हल्ल्याना विशिंग म्हणतात.)

3. एखादी बनावट वेबसाईट लिंक,app(जी तंतोतंत खऱ्या वेबसाइट, अँप सारखी दिसते फक्त त्यात सुक्ष्म फरक असतो आणि तो लोकांच्या नजरेत येत नाही) तुम्हाला ई-मेल मेसेज,व्हाट्सअप वर येते ती लिंक बनावट बँक अकाउंट/आर्थिक खाते लॉगिन पेज असते जे पीडित व्यक्तीचे लॉगिन क्रेडेन्शियल गोळा करते आणि त्यांना हल्लेखोरांना पाठवते, नंतर तुमची हि माहिती वापरून खऱ्या वेबसाईट वरून तुमचे पैसे चोरले जाऊ शकतात( DECEPTIVE फिशिंग म्हणतात )

4. बनावट लिंक डाकुमेंट्स ,वेबसाइट लिंक, अँप तुम्हाला ई-मेल मेसेज,व्हाट्सअप वर पवाठवले जातात ,तुम्ही जेव्हा यावर क्लिक करता त्यावेळी  malware हे वायरस तुमच्या कॉम्पुटर/लॅपटॉप , मोबाईल ची माहिती करप्ट(दूषित) करतात ..नंतर हल्लेखोर तुम्हाला धमकी देतो/ब्लॅकमेल करतो कि तुमचा डेटा आणि माहिती परत हवी असेल तर एवढे पैसे द्या.  

5. हल्लेखोर तुमचे ई-मेल चे पासवर्ड  चोरून त्या ई-मेल चा चुकीचा वापर करतो.

अशा प्रकारचे वेगवेगळे हल्ले ई-मेल मेसेज,सोसिअल मीडिया(व्हाट्सअप, ट्विटर,फ���सबुक इत्यादी),फोन वापरून केले जातात..

फिशिंग हल्ल्यांपासून किवां अटॅक पासून सुरक्षित कशे राहू शकतो 

१. लॉटरी आणि इतर फसव्या मेसेजेस,ई-मेल आणि फोन कॉल ना कधिच रिप्लाय करू नका.

२. जर वेबसाईट आणि अँप विश्वासू नसेल तर त्या वेबसाईट आणि अँप वरून /लिंक वरून काही पण डाउनलोड करू नका.

३. सतत तुमचा पासवर्ड बदलत राहा आणि तो कठीण आणि वेगळा असला पाहिजे, पासवर्ड कोणाला पण सांगू नका पाठवू पण नका.

४. तुमची संवेदनशील माहिती उदाहरण तुमचा ओटीपी ,पासवर्ड, कार्ड CVV कुणाला सांगू नका आणि पाठवू पण नका, कोणतीही बँक कधीच अशी माहिती मागवत नसते. 

५. जर वेबसाईट आणि अँप विश्वासू नसेल तर त्या वेबसाईट आणि अँप वर तुमची वयक्तिक माहिती रजिस्टर करू नका. 

६. फसवे वेबसाइट्स आणि app नेत्यांना वोट करा ,अनेक ऑनलाईन स्पर्धा आणि सर्वे घेत असतात फक्त विश्वासू व माहित असलेल्या लिंक्स आणि वेबसाइट्स वापरा.


धन्यवाद मित्रानो 

Invalid entry,please enter valid data.

Loading